MIDC : एमआयडीसीत सहा सबस्टेशन उभारा; लघुउद्योग संघटनेची महावितरणकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड औद्योगिक (MIDC) परिसरात 6 नवीन सबस्टेशनची उभारणी करावी. त्यापैकी भोसरी एमआयडीसीत 3, कुदळवाडी 1, तळवडे 1 व सेक्टर 7 येथे 1 सबस्टेशन उभारावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने महावितरणकडे केली.

औद्योगिक परिसरातील वीज वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी भोसरी विभागीय कार्यालय येथे उद्योजक आणि महावितरणच्या अधिका-यांची बैठक झाली. कार्यकारी अभियंता देवकर, उपकार्यकारी अभियंता चव्हाण, आकुर्डीचे कवडे, निगडीचे चौधरी तसेच पिंपरी- चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, संचालक प्रमोद राणे, नवनाथ वायाळ, सुहास गवस, एमआयडीसी परिसरातील सर्व उद्योजक उपस्थित होते.

फिडरला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे. फिडरच्या वीज वाहणाऱ्या तारांचे झोल कमी करणे. फिडर पिलर मधील HRC, फ्युज वायर व आतील खराब झालेले पार्टस बदलणे व खराब झालेले दरवाजे बदलणे. वेगवेगळ्या साईजचे केबल stock मध्ये ठेवणे व गरजेच्यावेळी 24 तास उपलब्ध करून देणे कारण बऱ्याच वेळेला केबल उपलब्ध नसते.

केबल नादुरुस्त वाहन ( FOULT FINDING VEHICALS) वेळेवर उपलब्ध करून देणे. फिडरची लांबी कमी करणे. ओव्हर लोड ट्रान्सफॉरमरवरचा लोड कमी करणे व त्यातील ऑईलची पातळी आवश्यक तेवढीच ठेवणे. आवश्यक त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉरमर बसविणे.

महावितरणच्या पिंपरी-चिंचवड औद्योगिक विभागासाठी (MIDC) मंजूर झालेला DPR कार्यान्वित करणे व नवीन DPR साठी पाठपुरावा करणे. सध्या अस्तित्वात असलेली स्विचिंग स्टेशन्स ओव्हर लोड आहेत, त्यांची संख्या वाढविणे. महापालिका, महावितरण व पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना यांची एक संयुक्त बैठक घेऊन रस्ता खोदाई करतांना महवितरणच्या केबल्स तोडल्या जातात त्यावर संयुक्तपणे उपाययोजना करण्याची मागणी उद्योजकांनी केली.

Smart City : स्मार्ट सिटीचा कालावधी एक वर्षांने वाढविला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.