Misal Party : खाद्यसंस्कृती जपणाऱ्या ‘दख्खनी मिसळ’मध्ये करा चमचमीत, पौष्टिक आणि चटकदार ‘मिसळ पार्टी’

पोटोबाला सुख देणारी 'दख्खनी मिसळ'ची नाविन्यपूर्ण ऑफर

एमपीसी न्यूज – सर्वच बाबतीत चोखंदळ असलेले निगडी आणि पिंपरी-चिंचवडकर खाद्यसंस्कृती जपण्याच्या बाबतीत मागे कसे राहतील. चटकदार, चमचमीत त्यातही पौष्टिक खाद्य पदार्थांना इथले खाद्यप्रेमी नेहमीच पसंती देत आले आहेत. निगडी व भोसरी येथे नव्याने सुरु झालेले ‘दख्खनी मिसळ’ हे चोखंदळ खाद्यप्रेमींच्या खास पसंतीस उतरले आहे. म्हणूनच ‘दख्खनी मिसळ’ने सुरु केलेल्या ‘मिसळ पार्टी’ला पिंपरी-चिंचवड मधील चोखंदळ खाद्यप्रेमी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. चटकदार मिसळ आणि गरमागरम सॅम्पल सोबत आलू टुक व कॉर्न टुक सॅन्डविच, शेंगदाण्याचा लाडू आणि वाफाळलेला चहा असलेल्या मिसळ पार्टीची धमाल सध्या निगडी व भोसरी येथील ‘दख्खनी मिसळ’ मध्ये सुरु आहे.

तुम्हाला जर चटकदार, चमचमीत, पौष्टिक पण स्वच्छ व टापटीप ठिकाणी खायची इच्छा असेल, तर दख्खनी मिसळ हे तुमच्यासाठी उत्तम ठिकाण आहे. चिकन, मटणाच्या त्याच-त्याच पार्ट्या करून कंटाळा आला असेल तर नवीन खाण्याची चटक असणा-यांसाठी दख्खनी मिसळ हे हक्काचं ठिकाण झालं आहे.

26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीला चटकदार पार्टीची धमाल उडवून द्या दख्खनी मिसळमध्ये. हक्काची सुट्टी वेस्ट न करता दख्खनी मिसळ टेस्ट करून सत्कारणी लावा.
अशी आहे ‘दख्खनी मिसळ’ची ‘मिसळ पार्टी’

तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी, परिवारातील सदस्यांसोबत ‘दख्खनी मिसळ’ला जायचं. जाऊन फक्त ‘मिसळ पार्टी’ची ऑर्डर द्यायची. मग तुमच्यासमोर येईल ‘चमचमीत मिसळ पाव, कॉर्न टुक +आलू टुक सॅन्डविच, शेंगदाणा लाडू’ त्यावर तुम्ही मस्त ताव मारायचा. पण एक लक्षात ठेवा, मिसळ खायची नसते. ती तर मनसोक्त हाणायची असते. तोंडाला पाणी सोडणारी मिसळ पोटभर हाणल्यानंतर शेवटी तुम्हाला मिळेल माधव चहा. कारण ज्याचा शेवट गोड त्याचं सगळंच गोड अशी म्हणच आहे ना ! हे सगळं तुम्हाला फक्त आणि फक्त 100 रुपयांमध्ये मिळणार बरं का….

‘दख्खनी मिसळ’मध्ये नुसता तेलाचा भडीमार केलेला रस्सा आणि पाव दिले जात नाहीत. तर उत्तम, चविष्ट सॅम्पल – पावाची मिसळ सोबत कांदा-लिंबू आहेच. सांगायचं काय तर – मारहाण करून एकमेकांची खुमखुमी उतरवण्यापेक्षा दख्खनी मिसळमध्ये या आणि भुकेची खुमखुमी उतरवा. त्यात खरी मजा आहे.

तुमचा मित्र परिवार मोठा आहे. त्यांच्यासोबत तुम्हाला ‘मिसळ पार्टी’ करायची आहे. तर त्याचीही चिंता करू नका. निगडी व भोसरी येथील ‘दख्खनी मिसळ’मध्ये आरामात मिसळवर ताव मारू शकतील, एवढी ऐसपैस जागा आहे.

निगडी येथील दक्खनीचे दालन तर खास तुमच्या पार्टीसाठी प्रायव्हसी, स्पेस देणारी आहे. तुमच्या छोट्या समारंभ पार्टीसाठी येथे खास वेगळी सोय सुद्धा करण्यात येईल.

कोणती मिसळ खाल ?

तुम्हाला तिखट खायची आवड आहे ? मिसळ सुद्धा तिखट खायचीय, तर तुम्ही ‘खान्देशी मिसळ’ घ्या. काळ्या रस्स्याच्या तर्रीचा मस्त झटका बसेल. तुम्हाला कमी तिखट मिसळ खायची आहे, तर तुम्ही ‘कोल्हापुरी मिसळ घ्या. तांबडा रस्सा खाल्ल्यानंतर तुमची ब्रह्मानंदी टाळी लागेल.

इथं चव, आदरातिथ्य, स्वच्छता प्रामुख्याने जपले जाते. तुम्ही कांदा लसूण खात नसाल आणि तुम्हाला कांदा लसूण विरहित मिसळ खायचीय. तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. ‘दख्खनी मिसळ’ मध्ये आल्यांनतर ऑर्डर करा ‘जैन मिसळ’. कांदा लसूण विरहित मिसळ एवढी चवदार असू शकते, हा अनपेक्षित अनुभव तुम्हाला दख्खनी मिसळ मध्येच मिळेल.

यासोबतच ‘दख्खनी मिसळ’ मध्ये नावीन्यपूर्व दूधसार मिसळ आणि उपवासाच्या वारी खास ‘उपवास मिसळ’ सुद्धा मिळते बरं का. त्यामुळे तुम्ही कुठल्याही गटातील असा, तुम्हाला मिसळ खायची असेल तर तुमच्या चवीची आणि हवीशी मिसळ एका ऑर्डरमध्ये तुमच्या समोर येते फक्त ‘दख्खनी मिसळ’मध्ये.

टॅग करा सरप्राईज मिळवा

त्याचं काय आहे, तुम्ही ‘दख्खनी मिसळ’मध्ये ‘मिसळ पार्टी’साठी आलात, तुम्ही मिसळवर यथेच्छ ताव मारला, पण त्याअगोदर तुम्ही मिसळसोबत तुमचं फोटोसेशन केलंत आणि ते दख्खनी मिसळच्या फेसबुक / इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केलंत, तर मिसळ पार्टी संपल्यानंतर तुम्हाला मिळेल एक चविस्ट सरप्राईज.

दख्खनी मिसळची फेसबुक लिंक

https://www.facebook.com/dakkhanimisal/

दख्खनी मिसळची इंस्टाग्राम लिंक – https://www.instagram.com/dakkhani.misal/

तुम्हाला अनेक ठिकाणी गचाळ किचनचा अनुभव आला असेल. इतर ठिकाणी काय होतंय ते माहिती नाही, पण ‘दख्खनी मिसळ’चे किचन ओपन आहे. इथं चवीसोबत स्वच्छतेला प्रथम प्राधान्य दिलं जातं. सॅनिटायजरने टेबल, खुर्च्या वारंवार निर्जंतुक केल्या जातात. दख्खनी मिसळचा स्टाफ देखील तुम्हाला आदरातिथ्याचा अनोखा अनुभव घडवून देईल. तर मिसळ पार्टी करायची असेल, पोटोबाची खुमखुमी उतरवायची असेल तर 31 जानेवारी पर्यंत निगडी व भोसरी येथील दख्खनी मिसळमध्ये ‘मिसळ पार्टी’ची खास ऑफर सुरु आहे. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता सरळ दख्खनी मिसळला येऊन धडका आणि ताव मारा आपल्या मनपसंत मिसळीवर….

‘दख्खनी मिसळ’ला कसे याल?

निगडी प्राधिकरण येथील भेळ चौकात या. भेळ चौकातून वाल्हेकरवाडीकडे जाणा-या मार्गावर अगदी 500 मीटरच्या अंतरावर डाव्या बाजूला ‘दख्खनी मिसळ’ तुमची वाट बघतेय.
google map – https://g.page/DakkhaniMisalNigdi?gm

 

पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी उड्डाणपुलाच्या खाली भोसरी पीएमटी चौकात या. आता चौकातून उजवीकडे वळा तिथे समोरच ग्रँड स्क्वेअर बिल्डिंगमध्ये दक्खनी मिसळ’ तुमची वाट बघत आहे.

google map – https://g.page/DakkhaniMisalBhosari?gm

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.