_MPC_DIR_MPU_III

MLA Mahesh Landge Discharged: आमदार महेश लांडगे व कुटुंबीयांना डिस्चार्ज, आता होम ‘आयसोलेट’

MLA Mahesh Landge Discharged: MLA Mahesh Landge and his family discharged, now home 'Isolate' सर्वांना मास्क वापरण्याचे केले आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष, भोसरीचे आमदार महेश लांडगे व त्यांच्या परिवारातील सहाजणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यातील कोरोनाची लक्षणे कमी झाली असून त्यांच्यावर ‘होम आयसोलेशन’द्वारे उपचार सुरू आहेत. 20 जुलै पर्यंत ते होम आयसोलेट असणार आहेत. 

_MPC_DIR_MPU_IV

महेशदादांनी स्वतःच फेसबुकद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, सर्वांनी मास्क वापरावा. मास्क लावलेला आपला फोटो सोशल मीडिया वर शेअर करा, पोस्टमध्ये हे हॅशटॅग जोडा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आमदार महेश लांडगे यांना त्रास होत असल्याने कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने 29 जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यांच्या कुटुंबातील सहा सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

चार दिवसांच्या उपचारांनंतर त्यांच्यातील कोरोनाची लक्षणे कमी होत गेली. त्यामुळे त्यांना आणि कुटुंबीयांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. याता त्यांच्यावर होम आयसोलेशनद्वारे उपचार सुरू आहेत.

_MPC_DIR_MPU_II

याबाबतची फेसबुकवर माहिती देताना आमदार महेश लांडगे म्हणतात, नमस्ते! माझी व माझ्या परिवाराची प्रकृती स्थिर असून आम्ही आदित्य बिर्ला रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या होम आयसोलेशन द्वारे डॉ.विनायक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कुटुंब घरीच उपचार घेत आहोत. काळजी नसावी, 15-20 जुलै पर्यंत सदर ट्रीटमेंट सुरु राहील.

मास्क वापरण्याचे शहरवासीयांना आवाहन!

जसे गुरू आपल्या जीवनाला आकार देतो त्याचप्रमाणे ह्या पिंपरी-चिंचवड शहराने आपल्याला घडवले आहे! आज गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूदक्षिणा म्हणून या शहराला लवकर कोरोनामुक्त करण्याचा निश्चय करूया! माझे सर्व नागरिकांना आवाहन सर्वांनी मास्क वापरावा. मास्क लावलेला आपला फोटो सोशल मीडिया वर शेअर करा, पोस्टमध्ये हे हॅशटॅग जोडा असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.