Mulshi: मुळशीला फिरायला गेलेल्या पुणे, पिंपरी-चिंचवडमधील 45 पर्यटकांवर गुन्हा दाखल

Crime filed against 45 tourists from Pune, Pimpri-Chinchwad at mulshi कोरोना संसर्गामुळे पावसाळी पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज – मुळशी येथे फिरायला गेलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील 45 जणांविरोधात पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच ज्यांनी मास्क घातला नव्हता त्यांच्याकडून 500 रुपये दंड देखील वसूल करण्यात आला.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुणे जिल्हा कार्यालयाने यावर्षी भोर, मुळशी, मावळ आणि जुन्नर येथील अनेक पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घातली आहे.

तरीही आदेशाचे उल्लंघन करून मुळशी येथे फिरायला गेलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील 45 जणांविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतील पौड पोलिसांनी भुगाव, माले व लवासा रस्त्यावर गस्त घालत असताना आढळलेल्या 45 पर्यटकांवर दंड आकारण्यात आला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे, पोलिस उपनिरीक्षक रेखा दुधभाटे व अनिल लवाटे, पोलीस हवालदार संतोष कुंभार, पोलीस नाईक नितीन गार्डी आदींनी पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या देखरेखीखाली ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.