Pune: माजी आमदार योगेश टिळेकर आणि त्यांच्या मुलाला कोरोना

hadapsar's Former MLA Yogesh Tillekar and his son Corona positive दोन दिवसांपूर्वी ताप व कणकण आल्याने टिळेकर आणि त्यांच्या मुलाची कोव्हिड-19 ची तपासणी करण्यात आली होती.

एमपीसी न्यूज- भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तथा माजी आमदार योगेश टिळेकर आणि त्यांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. टिळेकर यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पाठोपाठ आता टिळेकर यांनाही कोरोना झाला आहे. पुणे महापालिकेच्या नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्याप्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. त्यातून ते वेळीच उपचार घेतल्याने बरेही झाले आहेत.

दोन दिवसांपूर्वी ताप व कणकण आल्याने टिळेकर आणि त्यांच्या मुलाची कोव्हिड-19 ची तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

तुमच्या आशीर्वादामुळे लवकरच बरा होणार असल्याचे टि्वट योगेश टिळेकर यांनी केले आहे. पुणे शहरात आता कोरोनाचे 20 हजार 668 रुग्ण झाले आहेत.


तर 12 हजार 689 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. या रोगामुळे आतापर्यंत 703 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शहरात कोरोनाचे 7 हजार 226 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पुणे शहर आणि जिल्ह्यात करोनाची स्थिती गंभीर बनत चालली आहे. पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण 20 हजारांच्या पुढे गेले आहेत. कोरोनाचे संकट तातडीने आटोक्यात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

सार्वजनिक आणि खासगी ठिकाणी मास्क लावणे, सॅनिटायजरचा वापर करणे, फिजिकल डिस्टनसिंग पाळणे आवश्यक असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.