MNS News : वसंत मोरे यांचा फैसला दोन दिवसात; कोअर कमिटीच्या बैठकीनंतर बाबू वागस्कर यांचे स्पष्टीकरण

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS News) माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात येण्याची ऑफर देण्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील एका लग्न समारंभात हे दोघे एकत्र आले असताना अजित पवारांनीच त्यांना ही ऑफर दिली असे म्हटले जाते. दरबार या घटनेनंतर वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली होती. पक्षाच्या कुठल्याच कार्यक्रमात मला बोलावलं जात नाही, मला स्टेजवर बसवले जात नाही. भाषणासाठी वेळ दिला जात नाही. असं सांगत त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. याविषयी आपण राज ठाकरे यांच्यासोबतही बोललो असल्याचं त्यांनी सांगितलं होते.

मात्र वसंत मोरे यांच्या या भूमिकेनंतर मनसेतून कुठलीच प्रतिक्रिया आली नव्हती. आता मात्र मनसेचे उपनेते बाबू वागस्कर यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मनसेच्या कोअर कमिटीची मंगळवारी पुण्यात एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलत असताना वसंत मोरे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीच्या भूमिकेवर पक्ष दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करेल अशी माहिती त्यांनी दिली.

मागील वर्षभरापासून वसंत मोरे पक्षावर नाराज आहेत अशी वक्तव्य करत आहेत. वसंत मोरे यांच्या भूमिकेने पक्षाची बदनामी होईल, पक्षात फूट पडेल असे चित्र निर्माण होत (MNS News) आहे. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केल्याने वसंत मोरे यांच्या मनात नेमकं चालल तरी काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसात त्यांच्या या नाराजीबाबत पक्ष काय भूमिका घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Pune News : फुरसुंगी आणि उरूळी देवाची होणार नगरपालिका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.