Pune : मनविसे शिष्ट मंडळाने वर्षा गायकवाड यांना शाळा व कनिष्ठ महाविद्यालय संदर्भात कथन केल्या तक्रारी

एमपीसी न्यूज – मनविसे शिष्ट मंडळाने शुक्रवारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना शाळा व कनिष्ठ महाविद्यालय संदर्भात अनेक तक्रारी कथन केल्या.

त्या खालीलप्रमाणे

१) शिक्षण हक्क कायदा यांची पायमल्ली
२) बाॅयोमॅट्रीक हाजरी आदेशाची सर्रास पायमल्ली
३) इंटीग्रेटेड काॅलेजच्या मान्यता रद्द करणे
४) खाजगी कोचिंग क्लासेस बंधने आण्यासाठी सादर झालेला विनिनियम वर अधिनियम करण्यासाठी प्रारित करणे
५) सर्व शाळा महाविद्यालयमधे क्रीडा धोरण आखणे
६) विद्यार्थी आरोग्यासाठी प्रत्येक शाळेत सुर्यनमस्कार व प्राणायम बंधनकारक करणे
७) एम. आय. टी. शाळा व जे. एन. पेटीट वर शिक्षण हक्क कायदा भंगची कारवाई करणे, असे सर्व विषयाचे चर्चा व निवेदन देण्यात आले.

लवकरच कारवाई करण्याचे आदेश त्यांनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, उपसंचालक ओक, शिक्षण अधिकारी डाॅ. गणपत मोरे यांना या त्वरीत विषयात लक्ष घालण्यास सांगितले आहे.

मनविसे शिष्टमंडळात प्रशांत कनोजिया मनविसे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र कार्यकरणी सदस्य शैलेश विटकर, रवींद्र बनसोडे, रुपेश घोलप मनविसे विभाग सचिव प्रविण कदम, दत्ता माळी व मनविसे पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.