Pimpri : पादचा-यांचे मोबाईल चोरणा-यांच्या मुसक्या आवळल्या; गुन्हे शाखेची कामगिरी

पिंपरी पोलीस ठाण्यातील चार गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जाणा-या नागरिकांचे मोबाईल फोन हिसकावून चोरी करणा-या तीन चोरांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने केली. या कारवाईमध्ये सहा मोबाईल फोन, एक दुचाकी असा एकूण 90 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामुळे पिंपरी पोलीस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

सोमनाथ बाळासाहेब लबडे (वय 20, रा. भोसरी), हृषीकेश शिवाजी मोहिते (वय 20, रा. गव्हाणे वस्ती, आदिनाथ नगर गार्डन जवळ, भोसरी), गौरेश गिरीश नाईक (वय 20, रा. हुतात्मा चौक, आळंदी रोड, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या मोबाईल चोरांची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याने पायी चालत जाणा-या नागरिकांचे मोबाईल फोन चोरण्याचा घटनांमध्ये वाढ होता आहे. या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे एक पथक काम करत होते. या पथकाला पिंपरी पोलीस ठाण्यातील एका मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी सोमनाथ भोसरी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सोमनाथ याला भोसरी मधून ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने हृषीकेश आणि गौरेश यांच्या मदतीने पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यानुसार तिघांनाही अटक करण्यात आली. तिघांकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे सहा मोबाईल फोन, एक दुचाकी असा एकूण 90 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे पिंपरी पोलीस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

तसेच तिन्ही आरोपींकडून अन्य पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. त्याबाबत तपास सुरु आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली मरळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस कर्मचारी संतोष बर्गे, महादेव धनगर, हेमंत खरात, सुरेंद्र आढाव, प्रमोद लांडे, कैलास बोबडे, प्रमोद हिरळकर यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.