Pune – अमेरिकन डॉलर दाखवून लुटणारी टोळी अटकेत

एमपीसी न्युज – अमेरिकन डॉलर असल्याचे खोटे सांगून रुमालामध्ये पेपरचा बंडल देऊन फसवणा-या टोळीला पोलिसांनी सापळा रचून सोनार अळी, हडपसर येथे अटक केली आहे.

नाहीद अमिन रहमान(वय26, रा. पश्चिम बंगाल), हाफीझुल रुफीकुल सरदार(वय 23, रा. पश्चिम बंगाल), समोन अत्तीयर खलिफा(वय 31 रा. पश्चिम बंगाल ), ओनिक फकरुल शेख (वय 29, रा. नॉर्थ वेस्ट दिल्ली), सैदुल उबेद शेख(वय 28, रा. नॉर्थ वेस्ट दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जागेच्या व्यवहारासाठी 90 हजार एवढी रोख रक्कम घेऊन त्याबदल्यात अमेरिकन डॉलर असल्याचे खोटे सांगून रुमालामध्ये पेपरचा बंडल देऊन चारजण पळून गेले ही घटना 18 ऑगस्टला हडपसर परिसरात घडली होती.

या गुन्ह्याचा तपास चालू असताना आरोपी सोनार अळी, हडपसर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार सापळा रचून पाचही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना अटक करून त्यांच्याकडून 104 अमेरिकन डॉलर्स , रूमला मध्ये गुंडाळलेला पेपरचा बंडल, 25 हजारांची रोकड, 5 मोबाईल असा एकूण 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात केला.  याआधी केलेल्या गुन्ह्यांची कबुलीही आरोपींनी दिली आहे. आरोपीना आज न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमंडची मागणी करण्यात आलेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.