Monsoon News: मॉन्सून केरळमध्ये दाखल; 11 जूनपर्यंत महाराष्ट्रात येण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – शेतकऱ्यांसह सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. मॉन्सून आज केरळमध्ये दाखल झाला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने ट्विटरवरुन दिली. केरळच्या काही भागात पावसाच्या सरी बरसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

केरळमध्ये वर्दी दिल्यानंतर मॉन्सूनची पुढील वाटचाल सुरु होईल. 11 जून रोजी महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

केरळच्या दक्षिण भागात मॉन्सून सक्रिय झाला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मॉन्सून केरळमध्ये दोन दिवस उशिरा दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यंदाचा मॉन्सूनचा पाऊस सरासरीच्या सामान्य राहिल, असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वी वर्तवला आहे.

केरळमध्ये सामन्यत: 1 जून रोजी मॉन्सून दाखल होतो. परंतु, यंदा दोन दिवस उशिरा त्याने हजेरी लावली. यंदा मॉन्सून केरळमध्ये वेळेपेक्षा उशिरा पोहोचला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.