Alandi : आळंदीमध्ये मासिक वद्य एकादशी भजन महोत्सव

एमपीसी न्यूज : आळंदी (Alandi) मधील ज्ञानदर्शन धर्मशाळेत दि.13 रोजी  मासिक वद्य एकादशी भजन महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन भक्ती शक्ती संघाच्या वतीने करण्यात आले होते. सुप्रसिद्ध गायक हभप अवधूत गांधी यांनी आपल्या सुमधूर आवाजात येथे भजन व भक्तिगीते  गायली. अवधूत गांधी यांच्या आवाजाने श्रोते एकदी मंत्र मुग्ध झाले.

Chinchwad : टाटा मोटर्समध्ये मॉक ड्रील

तसेच कार्यक्रमाच्या शेवटी हिंदू राष्ट्र सेना संस्थापक /अध्यक्ष धनंजय देसाई यांचे आगमन झाले. त्यांनी वारकरी,हिंदुराष्ट्र, धर्मांतर याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी भक्ती शक्ती संघाच्या वतीने त्यांचा हार , श्रीफळ, शाल,  ज्ञानेश्वरी देऊन सत्कार करण्यात आला.

 

यावेळी भक्ती शक्ती संघ अध्यक्ष संदीप महाराज लोहर,  ह भ प संग्राम बापू भंडारे,पुरुषोत्तम महाराज पाटील, सुप्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर मेश्राम, ह भ प आनंद महाराज तांबे, ह भ प आत्माराम शास्त्री , निलेश बोरचटे व  वारकरी संप्रदयातील मान्यवर आणि वारकरी विद्यार्थी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.