Moshi : बारणेवस्ती मधून टेम्पो चोरीला

एमपीसी न्यूज – बारणेवस्ती मोशी येथील यु प्लास्टिक स्क्रॅप ट्रेडर्स येथे पार्क केलेला टेम्पो (Moshi) अज्ञातांनी चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 15) सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आली.

Pimpri : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

मोहम्मद उमर अन्वर अली शेख (वय 36, रा. मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचा पाच लाख रुपये किंमतीचा टेम्पो (एमएच 14/जेएल 0906) मागील तीन महिन्यांपासून बारणेवस्ती मोशी येथील यु प्लास्टिक स्क्रॅप ट्रेडर्स समोर पार्क केला होता.

शुक्रवारी रात्री साडेअकरा ते शनिवारी सकाळी साडेआठ वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांचा टेम्पो चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत (Moshi) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.