Dighi : वेश्या व्यवसाय प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – एका महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून ( Dighi ) वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Moshi : बारणेवस्ती मधून टेम्पो चोरीला

ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि. 14) सायंकाळी चऱ्होली फाटा, दिघी येथे केली.

पोलीस अंमलदार गणेश कारोटे यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांनी एका महिलेला पैशांचे आमिष दाखवले. त्या महिलेकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला.

त्यातून मिळालेल्या पैशांवर आरोपींनी आपली उपजीविका भागवली.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा नोंदवला आहे.

पिडीत महिलेची पोलिसांनी सुटका केली आहे. दिघी पोलीस तपास करीत ( Dighi ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.