Chakan : शेळ्या घेऊन जाणाऱ्या पिकअपला कंटेनरची धडक; बारा शेळ्यांसह एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिकअपमधून शेळ्या घेऊन जात असतना भरधाव वेगात जाणाऱ्या (Chakan) कंटेनरने पिकपला जोरात धडक दिली. त्यात पिकपमधील बारा शेळ्या आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

Moshi : बारणेवस्ती मधून टेम्पो चोरीला

तसेच पिकप चालक जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि. 15) पहाटे पाच वाजता शिक्रापूर-चाकण रोडवर शेलगाव येथे घडला.

बबन वसंत राठोड असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पिकप चालक ईश्वर विक्रम जाधव (वय 21, रा. अहमदनगर) हे जखमी झाले असून त्यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार एमएच 46/एआर 6262 या कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्यासोबत बबन राठोड हे फिर्यादी यांच्या पिकप मध्ये शेळ्या घेऊन शिक्रापूर-चाकण रोडने जात होते.

शेलगाव येथे भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने पिकपला समोरून जोरात धडक दिली. त्यात पिकप मधील बारा शेळ्यांचा मृत्यू झाला. बबन राठोड हे गंभीर जखमी होऊन मयत झाले.

तर फिर्यादी हे जखमी झाले. अपघात झाल्यानंतर कंटेनरचालक घटनास्थळी न थांबता तसेच जखमींना उपचारासाठी न नेता पळून गेला. चाकण पोलीस तपास करीत (Chakan) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.