Pune : पुणे राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजितदादांच्याच पाठिशी : दीपक मानकर

एमपीसी न्यूज : पुणे (Pune) शहरातील कार्यकारिणीमध्ये सर्व घटकांतील ज्येष्ठ, महिला, पुरुष, युवक युवती, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सहभागी करून सर्वांना काम करण्याची योग्य संधी देण्यात येणार असून पुणे शहरातून मोठी ताकद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठिशी उभी केली जाईल, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी कार्यकारिणी बैठकीत केला.

Chakan : शेळ्या घेऊन जाणाऱ्या पिकअपला कंटेनरची धडक; बारा शेळ्यांसह एकाचा मृत्यू

शहर राष्ट्रवादीची पहिली कार्यकारिणी बैठक शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.त्यावेळी ते बोलत होते.  या बैठकीस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रवक्त्या रुपाली ठोंबरे, कार्याध्यक्ष प्रदिप देशमुख,माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, दत्तात्रय धनकवडे, शंकर केमसे, अप्पा रेणुसे, बंडू गायकवाड प्रकाश कदम, महेश शिंदे, सुभाष जगताप, बाळासाहेब बोडके, प्रदीप गायकवाड, प्रिया गदादे, भैय्यासाहेब जाधव, सदानंद शेट्टी, बाबा पाटील यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी, इतर मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी दीपक मानकर पुढे म्हणाले, अजितदादांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात पुणे (Pune) शहरात पक्ष संघटना मजबूत करून पक्षाचे धोरण आणि भूमिका ही पुणेकरांचे हित लक्षात घेऊनच असेल.

शिवाय लवकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर कार्यालय नव्याने उभे केले जात असून ते माझ्या वैयक्तिक नाही तर पक्षाच्या नावेच असेल, ही हमी देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.