Moshi : फोन उचलला नाही म्हणून पत्नीला सायकलच्या वायरने मारहाण

एमपीसी न्यूज – फोन उचलला नाही म्हणून पत्नीला सायकलच्या वायरने मारहाण केली. ही घटना मोशी येथे घडली.

शारदा दादा खाडे (वय 30) असे मारहाणीत जखमी झालेल्या महिलेचे नाव असून त्यांनी बुधवारी (दि. 16) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दादा महादेव खाडे (वय 38, दोघेही रा. आदर्शननगर, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या (पती) संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शारदा आणि संशयित आरोपी दादा हे पती-पत्नी आहेत. सोमवारी (दि. 14) संशयित आरोपी दादा याने आपली पत्नी शारदा हिला फोन केला होता. मात्र, त्यांनी तो उचलला नाही. यामुळे संतापलेल्या आरोपी दादा याने रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घरी आल्यावर सायकलच्या वायरने शारदा हिला जबर मारहाण करून जखमी केले. याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार भोरकडे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.