Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी खासदार हेमंत गोडसे यांचा राजीनामा; आंदोलकांच्या प्रश्नावर तात्काळ प्रतिसाद

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी खासदारकिचा राजीनामा (Maratha Reservation ) दिल्याची मोठी बातमी समोर येत आहे. काही तासांपूर्वी त्यांनी आंदोलन स्थळी भेट दिली होती. यावेळी त्यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यांनी हा राजीनामा पक्षाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला आहे. 

नाशिक येथे जिल्हा न्यायालयासमोरील शिवतीर्थावर सकल मराठा समाजाचे उपोषण सुरू आहे. येथे रविवारपासून नाना बच्छाव हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. यावेळी खासदार हेमंत गोडसे हे उपोषणस्थळी भेट देण्यास गेले असता त्यांना आंदोलकांनी मराठा आरक्षणाबाबत इतकी आत्मियता असेल तर, संसदेत या विषयावर आवाज उठवा. त्यासाठी तुम्ही  खासदारकीचा राजीनामा का देत नाही, असा सवाल करण्यात आला.

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

हा प्रश्न त्यांच्या जिव्हारी लागला असून त्यांनी तात्काळ आपला राजीनामा दिला. आजपर्यंत तुम्ही कुठे होतात, केवळ (Maratha Reservation)  (Maratha Reservation ) निवडणुकीत मराठा हवा का, असे धारेवर धरत माघारी फिरा, संसदेत मराठा आरक्षणावर बोला, असे आंदोलकांनी त्यांना सुनावले होते.  जिल्ह्यात 550 गावांमध्ये आमदार, खासदार बंदी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.