MPC Online Ganeshotsav result : ‘एमपीसी’च्या ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर, विजेत्यांना मिळणार चांदीचे नाणं 

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाचा उत्साह वाढविण्यासाठी, पिंपरी चिंचवड शहरातील पहिले न्यूज पोर्टल ‘एमपीसी न्यूज’ने ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धा आयोजित केली होती. विविध ठिकाणावरून नागरिकांचा या ऑनलाईन स्पर्धेला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, शहराच्या विविध भागातून सहा विजेते निवडण्यात आले आहेत. या स्पर्धेकांना प्रसिद्ध ‘दिलीप सोनगिरा ज्वेलर्स’ यांच्या कडून चांदीचे नाणं बक्षिस म्हणून दिले जाणार आहे. 

सलग दुस-या वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट होते, त्यामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याची सूचना प्रशासनाने दिली होती. ‘एमपीसी न्यूज’ने गणेशभक्तांसाठी ऑनलाईन गणेशोत्सव संकल्पना राबवली. यामध्ये हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला, प्राप्त फोटो पैकी उत्कुष्ट फोटो एमपीसीच्या पोर्टलवरती प्रकाशित करण्यात आले. या ऑनलाईन स्पर्धेचे प्रायोजकत्व शहरातील प्रसिद्ध ज्वलर्स ‘दिलीप सोनगिरा’ यांनी स्वीकारले होते. या स्पर्धेतून निवडल्या जाणा-या सहा अंतिम विजेत्यांना दिलीप सोनगिरा यांच्या मार्फेत चांदीचे नाणं दिले जाणार आहे.

‘एमपीसी न्यूज’ ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी झालेल्या गणेशभक्तांची प्रतिक्षा संपली असून स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्पर्धेचे परीक्षण अनुप घुंगुर्डे यांनी केले. पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून सहा विजेत्यांची नावे निवडण्यात आली आहेत. या भाग्यवान विजेत्यांना दिलीप सोनगिरा यांच्या मार्फेत चांदीचे नाणं दिले जाणार आहे.

विजेत्या स्पर्धकांचे नावे खालीलप्रमाणे –

शीतल आंबले (चिखली), तृप्ती व्यवहारे (चौधरी पार्क, वाकड), आभास दानी (इयत्ता तिसरीचा विद्यार्थी, निगडी, प्राधिकरण), एकता म्हस्के (भोसरी), गजानन खुळे (रहाटणी) आणि विनीत तिकोने (तापकीर नगर, काळेवाडी) असे ‘एमपीसी न्यूज’ ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्यांची नावे आहेत.

‘एमपीसी न्यूज’ ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण येत्या 12 तारखेला केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.