Pimpri: ….तर खासदार, आमदारांनी राजीनामे देऊन नगरसेवक म्हणून निवडून यावे – दत्ता साने 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील खासदार, आमदारांनी केंद्र, राज्य सरकारकडून निधी आणणे अपेक्षित आहे. परंतु, त्यांचे अधिक लक्ष्य पालिकेतच आहेत. दररोजच  खासदार, आमदार बैठक घेऊन अधिका-यांना सूचना देत आहेत. खासदार, आमदारांचे पालिकेत आर्थिक देणे-घेणे राहिले असेल. पालिकेतच जीव घुटमळत असेल तर खासदार, आमदारांनी राजीनामे देऊन पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून यावे, असा उपरोधिक सल्ला विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी खासदार, आमदारांना दिला आहे. 

खासदारांनी दिल्लीत लक्ष्य घालावे. आमदारांनी मुंबईत बघावे. शहरासाठी जास्तीत-जास्त निधी आणावा. पालिकेत लक्ष्य देण्याची गरज नाही. पालिकेत 128 नगरसेवक सक्षम आहेत. त्यामुळे खासदार, आमदारांनी लक्ष्य देण्याची आवश्यकता नाही. खासदार, आमदार वेगवेगळ्या बैठका घेऊन अधिका-यांना सूचना देत आहेत. एक आमदार म्हणतात काम करायचे तर दुसरे म्हणतात करायचे नाही. त्यामुळे कोणतेच काम होत नाही.

खासदार, आमदारांचे पालिकेत काही आर्थिक देणे-घेणे राहिले असेल, पालिकेत जीव घुटमळत असेल तर त्यांनी पदाचे राजीनामे द्यावेत. नगरसेवक म्हणून निवडून यावे, असेही साने म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.