MPSC Exam : MPSC परीक्षेला बसण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ, राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ देण्यात आली आहे. आज बुधवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. वयोमर्यादा ओलांडली आहे अशा विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
दोन वर्ष कोरोनामुळे एमपीएससीच्या. परीक्षा झाल्या नव्हत्या. मुदतवाढ दिल्याने MPSC परीक्षेसाठी मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना परत हा मोठा दिलासा मिळाला आहे.

येत्या 19 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे. अनेक विद्यार्थ्यांची ही मागणी होती, त्यानुसार सरकारने हा निर्णय घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.