Mumbai News : विराटच्या 10 महिन्यांच्या चिमुरडीवर अत्याचाराची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक 

एमपीसी न्यूज – भारतीय क्रिकेट माजी कर्णधार विराट कोहली याच्या मुलीवर अत्याचार करण्याची धमकी देणाऱ्या नराधमाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. T20 वर्ल्डकप दरम्यान भारत आणि पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघावर मोठ्या प्रमाणावर टिका झाली. यामध्ये एका माथेफिरूने विराटच्या मुलीवर आत्याचाराची धमकी दिली होती. 
मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने आरोपीला हैदराबाद येथून अटक केली असून, त्याला मुंबईत आणण्यात येत आहे. रामनागेश अलीबथिनी असून त्याचे (वय 23) असे अटक आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे हा आरोपी सॉफ्टवेअर इंजिनीअर असल्याचे समोर आले आहे.

टीम इंडियाच्या पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर या घटनेला धार्मिक रंग देत मोहम्मद शमीला टीकेचा धनी ठरवण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या समर्थनात अनेकजण उभे राहिले होते, त्यापैकी विराटही एक होता. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेदेखील शमीला पाठिंबा दिला. मात्र, काही माथेफिरुंनी विराटला लक्ष्य केले. ट्विटरवर विराटच्या अवघ्या 10 महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्याच्या धमक्या दिली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.