Virat Kohli : विराट कोहलीची एकदिवसीय आणि T-20 प्रकारातून अनिश्चित काळासाठी विश्रांती?

एमपीसी न्यूज -भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीशी संबंधित मोठी बातमी (Virat Kohli)समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीने बीसीसीआयला सांगितले की, त्याला वनडे आणि टी-20 फॉरमॅटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक हवा आहे. म्हणजेच त्याला वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये खेळायचे नाही. मात्र, भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माची वनडे आणि टी-20 फॉरमॅटबाबत काय भूमिका आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

विराट कोहलीला वनडे आणि टी-20 फॉरमॅट का खेळायचे नाही?

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या (Virat Kohli)सूत्रांनी सांगितले की, विराट कोहलीला कसोटी फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करायचे आहे. या कारणामुळे त्याला एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅट खेळायचे नाही. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर विराट कोहलीने बीसीसीआयला सांगितले की तो मर्यादित षटकांच्या फॉरमॅटसाठी उपलब्ध नाही. तसेच तो किती दिवस खेळणार नाही याबाबतही स्पष्टता नाही.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची T20 मालिका खेळणार आहे, विराट कोहली या मालिकेसाठी उपलब्ध नाही. यानंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे.

Talegaon Dabhade : उद्योजक नवनाथ म्हसे यांचा जीवनपट आजच्या तरूणांना प्रेरणादायी – उद्योजक विलास काळोखे
रोहित शर्मा टी-20 फॉरमॅटमध्ये दिसणार का?


भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटसाठी उपलब्ध असेल की नाही हे सध्या स्पष्ट झालेले नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली भारताकडून टी-20 फॉरमॅटमध्ये जवळपास वर्षभरापूर्वी खेळले होते. दोन्ही खेळाडू 2022 च्या टी-20 विश्वचषकात दिसले होते, पण तेव्हापासून दोघेही भारताकडून टी-20 फॉरमॅट खेळले नाहीत.

मात्र, नुकत्याच झालेल्या विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहलीने उत्कृष्ट फलंदाजी दाखवली होती. सुमारे 7महिन्यांनंतर टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. टी-20 विश्वचषकात रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करू शकतो, असे मानले जात असले तरी विराट कोहलीच्या खेळण्यावर शंका आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीला वनडे आणि टी-20 फॉरमॅट खेळायचे नाही, त्यामुळे विराट कोहली टी-20 वर्ल्ड कपमध्ये दिसणार की नाही हे येणारा काळच सांगेल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.