Talegaon Dabhade : उद्योजक नवनाथ म्हसे यांचा जीवनपट आजच्या तरूणांना प्रेरणादायी – उद्योजक विलास काळोखे

एमपीसी न्यूज – तन्वी ट्रॅव्हल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा एका बस पासून ( Talegaon Dabhade ) सुरू झालेला प्रवास आज 45 बस पर्यंत आला आहे. व्यवसायाचे उत्तम व्यवस्थापन आणि चिकाटी याच्या जोरावर कंपनीचे मालक व रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे सदस्य नवनाथ म्हसे यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. त्यांचा जीवनपट आजच्या तरुणांना प्रेरणा देणारा आहे,असे मत उद्योजक विलास काळोखे यांनी व्यक्त केले.
या उपक्रमासाठी अशोक म्हसे,जयश्री म्हसे,संकेत गुंजाळ व तन्वी ट्रॅव्हल्सचे सहकारी,सिंटरकाॅम कंपनीचे अधिकारी व कर्मचारी तसेच रोटरी सिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
तन्वी ट्रॅव्हल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रोप्रायटर व रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे सदस्य नवनाथ म्हसे यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ तळेगाव एमआयडीसीतील मंगरूळ येथील सिंटरकाॅम  प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कै.श्रेयस अशोक म्हसे यांचे स्मरणार्थ रक्तदान शिबिर नुकतेच संपन्न झाले. नवनाथ म्हसे यांच्या व्यक्तिमत्त्वात शून्यातून विश्व निर्माण करण्याची किमया आहे.आज ट्रॅव्हल्स व्यवसायात अतिशय उत्तम कामगिरी ते करतात,एका बस पासून सुरू झालेला प्रवास आज त्यांच्या अत्याधुनिक पद्धतीच्या 45 बस विविध ठिकाणी कार्यरत आहेत.

अतिशय उत्तम व्यवस्थापन,ग्राहकांना सर्वोत्तम सेवा त्यांच्या कंपनीमार्फत दिली जाते. अफाट कष्ट,जिद्द व चिकाटी त्यांच्यामध्ये असल्याने व्यवसायामध्ये यश कसे मिळवावे हे त्यांचे गुण सर्व परिचित आहेत म्हसे यांचे कार्य आजच्या तरुणांना प्रेरणा देणारे आहे असे प्रतिपादन रोटरी सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे यांनी करताना रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या.

त्याचबरोबर मॅनेजिंग डायरेक्टर जिग्नेश रावल,रोटरी सिटीचे सेक्रेटरी

शिक्षकनेते भगवान शिंदे,कंपनीच्या एच.आर.अंकिता पालवे,उद्योजक रामनाथ कलावडे,सागर महाले,राहुल काळे यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करताना नवनाथ म्हसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आज वैद्यकीय क्षेत्रात रक्ताची खूप गरज आहे हे जाणून म्हसे परिवाराने या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले असून पिंपरी चिंचवड ब्लड बॅंकेचे संदीप पांढरे यांच्याकडे 56 बॅगा रक्त सुपुर्त केले.
उपस्थितांचे स्वागत प्रोप्रायटर नवनाथ म्हसे यांनी केले तर तन्वी ट्रॅव्हल्स कंपनीच्या डायरेक्टर सुजाता नवनाथ म्हसे यांनी सर्वांचे आभार ( Talegaon Dabhade ) मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.