Pune : लोणावळा नजीक महामार्गावर पेटलेल्या ट्रकवर पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून नियंत्रण

एमपीसी न्यूज – . राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाच्या बंदोबस्तावरून (Pune)परत येणाऱ्या अग्निशमनदलाच्या जवांनानी आज (दि.29) लोणावळा नजीक महामार्गावर पेटलेल्या ट्रकवर पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्यात आले.

लोणावळा येथे महामार्गावर एक ट्रक पुढे जात असताना (Pune)चालू स्थितीत त्यामधून मागील बाजूस धुर येत असल्याचे निदर्शनास येताच संबंधित ट्रकला इशारा देत रस्याच्या बाजूला घेण्यास सांगितले. वाहनचालकाच्या मागील बाजूस असणारया लाकडी फडीने पेट घेतला असताना जवानांनी तातडीने पाण्याचा मारा करत सुमारे दहा मिनिटात आग पुर्ण विझवली व धोका टाळला. तसेच संबंधित ट्रकमध्ये दगडी कोळसा भरला असल्याचे समजले. अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान यांच्या सतर्कतेमुळे वेळीच लक्ष गेल्याने मोठी दुर्घटना टळली तसेच सुदैवाने कोणाला इजा झाली नाही.

Vadgaon Maval : शिवराज हॉटेलच्या रावणथाळीची ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया’मध्ये नोंद; एकाच थाळीत मिळतात 32 नॉन व्हेज डिश

ही कारवाई अग्निशमन वाहन हे वाघोली अग्निशमन केंद्र (पीएमआरडीए अग्निशमन विभाग,पुणे) येथील असून या कामगिरीत अग्निशमन केंद्र अधिकारी विजय महाजन, वाहन चालक राहुल शिरोळे, फायरमन विकास गायकवाड, विनीत खरात, ओमकार पाटील, महेंद्र देशमुख यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.