Railway : मलाही रेल्वेच्या गैरकारभाराचा वाईट अनुभव : संदीप खर्डेकर

एमपीसी न्यूज – मलाही रेल्वेच्या गैरकारभाराचा वाईट (Railway)अनुभव आल्याचे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी म्हटले आहे.
व्यवस्थापनाविरोधात रेल्वे मंत्रालयात तक्रार करून रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन हे सर्व त्यांच्या निदर्शनास आणून कारवाई साठी आग्रही भूमिका घेणार आहे. त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.

आज भारत गौरव यात्रा च्या चेन्नई येथून (Railway)पुण्याला येणाऱ्या 40 प्रवाश्यांना विषबाधा झाल्याचे वाचनात आले. मला ही रेल्वे च्या गैरकारभाराचा वाईट अनुभव आला.भोजनासह सर्वच बाबतीत अव्यवस्था होती. मात्र माझ्या दक्षिण दौऱ्यानंतर मी केलेल्या तक्रारींना कचऱ्याची पेटी दाखविल्याचे निदर्शनास येत आहे.

Talegaon Dabhade : उद्योजक नवनाथ म्हसे यांचा जीवनपट आजच्या तरूणांना प्रेरणादायी – उद्योजक विलास काळोखे

कोणतीही सुधारणा झालेली दिसून येत नाही. किंबहुना मला औपचारिकता म्हणून एक मेल आला पण पुढे काहीच झाले नाही. आता या गैरव्यवस्थापनाविरोधात रेल्वे मंत्रालयात तक्रार करण्यात येणार आहे. दिनांक 9 मार्च ते 19 मार्च च्या दरम्यान संपन्न झालेल्या दक्षिण यात्रा दरम्यान संदीप खर्डेकर यांना असुविधा जाणवली. व्यवस्थापक, आय आर सी टी सी. यांना सर्व तक्रारी चे मेल व उत्तर जोडण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.