Mumbai News : ठाकरे गटाच्या आणखी एका नेत्याला अँटी करप्शनची नोटीस

एमपीसी न्यूज : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला (Mumbai News) आणखी एक मोठा धक्का मिळाला आहे. आमदार वैभव नाईक यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाच्या राजन साळवी यांना अँटी करप्शनची नोटीस मिळाली आहे. यामध्ये मालमत्तेसंदर्भात उल्लेख करण्यात आला आहे. त्यांना 5 डिसेंबर रोजी अलिबाग येथील अँटी करप्शन कार्यालयात हजर राहण्याची नोटिस देण्यात आली आहे.

Voter Registration Camp : हिंजवडी परिसरात 5 डिसेंबर रोजी होणार मतदार नोंदणीचे विशेष शिबीर

अँटी करप्शन ब्युरोने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी वैभव नाईक यांना नोटीस पाठवली आहे. त्यांची चौकशी सुरू असताना आता राजेश साळवी यांना मिळलेलूया नोटीसीने ठाकरे गटात खळबळ माजली (Mumbai News) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.