Mumbai: आमची लढाई मोदी किंवा भाजपच्या विरोधात नव्हे तर एका ‘शक्ती’च्या विरोधात – राहुल गांधी

एमपीसी न्यूज – “राजाचा आत्मा आत्मा, ईडी, सीबीआय यांसारख्या ( Mumbai ) संस्थांमध्ये आहे. ईव्हीएमध्ये यांचा आत्मा आहे. यांची 56 इंच छाती नाहीच”, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज केली.

आज मुंबईत शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची सभा पार पडली. या सभेच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता झाली आहे. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, जम्मू काश्मीरमधील नेत्या महेबुबा मुफ्ती, वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आदी नेते उपस्थित होते.

यावेळी राहुल गांधी म्हणाले, भारत जोडो न्याय यात्रा आम्हाला करावी लागली कारण देशात संवादाचे सिस्टिम देशातील लोकांच्या हातात राहिलेली नाही. बरोजगारी, हिंसा, द्वेष यासारखे मुद्दे तुम्हाला मीडियामध्ये दिसत नाहीत.

 

Loksabha Election 2024 : मुक्त आणि पारदर्शक निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज ; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची माहिती

 

त्यामुळे आम्हाला ही यात्रा करावी लागली. कारण कोणताच पर्याय नव्हता. देशाच्या लक्षात आणून देण्यासाठी आम्हा सर्वांना 4 हजार किलोमीटर चालावे लागले. सोशल मीडियावरही यांचे नियंत्रण आहे. आपण एका शक्तीविरोधात लढत आहोत.

लोकांना वाटते आम्ही राजकीय पक्षाविरोधात लढत आहोत. हे खरे नाही. आम्ही राजकीय पक्षातून लढत नाहीत. हे भारतातील युवकांना समजून घेण्याची गरज आहे. आम्ही सर्वजण नरेंद्र मोदी यांच्याविरोधात किंवा भाजपविरोधात लढत नाहीत. आपण एका शक्तीविरोधात लढत आहोत. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे लोकं घाबरून भाजपसोबत गेले आहेत.

राहुल गांधी पुढे म्हणाले , नरेंद्र मोदी हा फक्त एक चेहरा आहे. चित्रपटातील नायकाप्रमाणे त्यांना एक रोल दिला गेला आहे. 56 इंचची छाती नसून पोकळ आहे. मला विचारण्यात आलं तुमची यात्रा कुठून कुठपर्यंत होईल. एक ठरलं होतं यात्रा मणिपूरमधून सुरुवात होईल. तिथे भाऊ भावाला गोळी मारत आहे. तिथूनच यात्रेची सुरुवात करायची असा ठरवलं. भारताला नवीन व्हिजन द्यायचा असेल, यात्रेचे समारोप धारावीत झाला पाहिजे. मोदी हे एव्हीम शिवाय निवडणूक जिंकू शकत नाहीत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.