Mumbai News :महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या दिनदर्शिकेचे शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

0

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र नवनिर्माण  चित्रपट सेनेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या मनसे चित्रपट सेना दिनदर्शिका 2021 चे प्रकाशन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते आज, शनिवारी करण्यात आले.

मुंबई, दादर येथील कृष्णकुंज येथील ठाकरे यांच्या निवासस्थानी हा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता.

मनसे चित्रपट सेनेचे संयुक्त सरचिटणीस विशाल हळदणकर यांच्या वतीने ही दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे.

अतिशय आकर्षक अशी दिनदर्शिका तयार केल्याबद्दल शर्मिला ठाकरे यांनी विशाल हळदणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.

यावेळी चित्रपट सेनेचे चिटणीस मंदार सबनीस संजय देवळे, संतोष शिंगाडे, भगवंत झिटे, उप चिटणीस राकेश गुरव. महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना उपविभागीय अध्यक्ष संदेश जगताप, चित्रपट सेनेचे पीव्हीआर युनिट अध्यक्ष अमोल पवार , क्लोराईड मेटल्स (पुणे) युनिट अध्यक्ष नवनाथ बारणे, युनिट सदस्य विक्रम दाभाडे, विकास शेळके, सोमनाथ करंजकर, नवनाथ बारणे, तसेच महाराष्ट्र सैनिक बबन मानरे, सचिन खंदारे, सुरज राठोड, प्रतिक साताडेकर, रत्नेश दुबे आदी यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.