Pune News : महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाकडून प्राचार्य डॉ. शेजवलकर यांना श्रद्धांजली अर्पण

एमपीसी न्यूज: ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, व्यवस्थापनतज्ञ आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे मानद अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांना संस्थेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

संस्थेच्या टिळक रस्त्यावरील अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोळविहीरे येथील महर्षी वाल्मिक विद्यालय, कोंढव्यातील जडावबाई दुग्गड विद्यालय, बारामती येथील शारदा निकेतन इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शेजवलकरांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव प्रसाद आबनावे, चेअरमन सुमन घोलप, उपाध्यक्षा प्रेमलता आबनावे यांनी श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे संचालक प्रथमेश आबनावे, सदस्य प्रज्योत आबनावे, अशोक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या कांबळे, महर्षि वाल्मिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना कुलुंगे, जडावबाई दुग्गड विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील भालके, शीतल आबनावे, विभा आबनावे आदी उपस्थित होते.

शेजवलकर सर आणि संस्थेचे गेल्या 50 वर्षांचे नाते होते. संस्थेच्या विस्तारात मानद अध्यक्ष म्हणून त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाने एक अधारवड गमावला आहे. संस्थेच्या व आबनावे परिवाराच्या वतीने शेजवलकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आल्याची माहिती प्रसाद आबनावे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.