Mumbai : नुशरतचे बोल्ड फोटो पाहून वडील पडले पेचात

एमपीसीन्यूज  : सध्याच्या नव्या पिढीतील अभिनेत्री नेहमीच आपल्या हटके अंदाजामुळे चर्चेत असतात. ‘प्यार का पंचनामा २’, ‘सोनू की टिटू की स्वीटी’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री नुशरत भरुचा कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. तसेच ती बऱ्याच वेळा  तिच्या फॅशन सेन्स आणि कपड्यांमुळे चर्चेत येत असते. नुशरतने कमी कालावधीमध्ये कलाविश्वात तिचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे.  

‘सोनू की टीटू की स्वीटी’ असे अतरंगी नाव असलेल्या चित्रपटातलं तिचं ‘छोटे-छोटे पेग मार’ हे गाणं प्रचंड गाजलं होतं. या गाण्यात नुशरतच्या बोल्ड लूकची प्रचंड चर्चा झाली होती. विशेष म्हणजे हे गाणं पाहिल्यानंतर नुशरतच्या वडिलांनी तिला पेचात पाडणारा प्रश्न विचारला होता.

या गाण्यात नुशरतने लाल रंगाचा ड्रेस घातला होता. विशेष म्हणजे नुशरतला या अंदाजात पाहिल्यावर ‘तू फक्त अंतर्वस्त्र घातले आहेस का?’ असा प्रश्न तिच्या वडिलांनी विचारला होता.

त्याविषयी अधिक माहिती देताना नुशरत म्हणाली की, ‘या गाण्याविषयी मी घरातल्यांना मुद्दाम सांगितलं नव्हतं. कारण हे गाणं पाहून त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय असेल याचा अंदाज मला लावता येत नव्हता. हे गाणं जेव्हा प्रदर्शित झालं, तेव्हा सुद्धा मी त्यांना सांगितलं नव्हतं. मात्र, एक दिवस मी चित्रपटाचं प्रमोशन करुन घरी आले त्यावेळी माझे आई-बाबा टीव्हीवर हे गाणं पाहत होते’.

पुढे ती म्हणते, ‘आई-बाबांना ते गाणं पाहताना बघून मी गुपचूप घरात शिरले. पण माझ्या वडिलांनी मला पाहिलं होतं. त्यानंतर ते माझ्या रुममध्ये आले आणि म्हणाले, तू फक्त अंतर्वस्त्र घातले होतेस? वडिलांचा हा प्रश्न ऐकून मला प्रचंड हसू आलं.

पण मी ब्रालेट परिधान केलं होतं हे त्यांना कसं काय सांगू मला समजत नव्हतं. मात्र मी कसंबसं करुन हा संवाद टाळण्याचा प्रयत्न केला.’ अलीकडेच एका पुरस्कार सोहळ्यात तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे ती ट्रोल झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.