Mumbai : लॉकडाऊन 3.0 मध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात काय सुरू राहणार?

एमपीसी न्यूज – शासनाने जाहीर केलेला लॉकडाऊन 2.0 आज, रविवारी संपत आहे. तत्पूर्वी शासनाने आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. उद्या (सोमवार, दि. 4) पासून पुढील दोन आठवडे (17 मे पर्यंत) पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात कोणकोणत्या गोष्टी सुरू राहणार?, याबाबत शासनाने जाहीर केले आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून रविवारी पुढील दोन आठवडे ज्या बाबी सुरू अथवा बंद राहणार याबाबतची सूची जाहीर करण्यात आली आहे. राज्याची पाच भागात विभागणी केली आहे. ग्रीन झोन, ऑरेंज झोन, रेड झोन, कंटेन्मेंट झोन आणि मुंबई महानगर परिसर (एमएमआर), पुणे महानगर परिसर (पीएमआर), मालेगाव असे पाच विभाग करण्यात आले आहेत.

ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. पीएमआर मध्ये पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे, खडकी आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हा परिसर येतो.

पीएमआरमध्ये कोणत्या गोष्टी सुरू राहतील –
दारूची दुकाने, मेडिकल दुकाने, ओपीडी, आवश्यक मालाचा पुरवठा, शहरातील बांधकामे, स्वतंत्र दुकाने, अत्यावश्यक सेवेतील दुकाने, अत्यावश्यक वस्तूंचा ऑनलाइन पुरवठा, बँक, फायनान्स, कुरिअर, पोस्ट, वैद्यकीय कारणांसाठी वाहतूक, सरकारी कार्यालये (5 टक्के उपस्थिती)

पीएमआरमध्ये कोणत्या गोष्टी बंद राहतील –
विमान, रेल्वे, आंतरराज्य प्रवास, शैक्षणिक संस्था, हॉटेल, मॉल्स, गर्दीची ठिकाणे, 10 पेक्षा कमी, 65 पेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती, टॅक्सी, कॅब, चारचाकी, दुचाकी, आंतरराज्य बस प्रवास, औद्योगिक कामगारांची वाहतूक, शहरातील उद्योग, खाजगी कार्यालये, कृषी क्षेत्राशी संबंधित, केशकर्तनालय, स्पा सेंटर

कंटेन्मेंट झोनमध्ये अत्यावश्यक वस्तूंची दुकाने आणि पुरवठा तसेच वैद्यकीय वाहतूक वगळता सर्व बंदच राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.