Pimpri : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना योद्धा यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विरोधात लढणाऱ्या महापालिका, आरोग्य विभाग आणि इतर सर्व कोरोना योद्धा यांचा आज, रविवारी केक कापून सत्कार करण्यात आला. बाॅम्बे इंजिनिअरींग ग्रूपचे प्रमुख स्टेशन कमांडंट ब्रिगेडीअर सेना मेडल एम. जे. कुमार यांनी सैन्य दलाच्या वतीने केक कापून व मिठाई देऊन सर्व कोरोना योद्धा यांच्या कार्याला सलाम केला.

महापालिका भवनात झालेल्या या कार्यक्रमासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आरोग्य वैद्यकिय अधिकारी डाॅ. के अनिल राॅय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डाॅ. पवन साळवे, वैद्यकिय अधिष्ठाता डाॅ. राजेंद्र वाबळे, डाॅ वर्षा डांगे, डाॅ. प्रविण सोनी, डाॅ. अनिकेत लाठी, डाॅ. लक्ष्मण गोफणे, डाॅ. शैला भावसार, डाॅ. जाॅन आदी उपस्थित होते.

कोरोनाला हरविण्यासाठी, कोवीड 19 वर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी नियोजन करून अंमलबजावणी करणाऱ्या महापालिका आयुक्त, कोरोना रूग्णांवर रूग्णालयात उपचार करणाऱ्या महापालिकेच्या डाॅक्टर्स, स्टाफनर्स व कर्मचाऱ्यांना कोरोना वाॅरियर्स म्हणून संबोधले जात आहे.

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारतीय सैन्य दलाच्या विशेष विमानाने पुष्पवृष्टी केली. पुण्यातही कोरोनावर उपचार करणा-या रुग्णालयावर पुष्पवृष्टी करण्यात आली. पोलीस, आरोग्य यंत्रणा आणि सफाई कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी भारतीय सैन्य दलाने हा विशेष उपक्रम राबविला आहे.

सैन्य दलाकडून होत असलेला गौरव सर्व कोरोना योद्धा यांच्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. यामुळे कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या प्रत्येकाला नवीन स्फूर्ती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.