Pimpri News : महापालिका सुरक्षारक्षकांनाही कोविड भत्ता मिळणार

एमपीसी न्यूज – कोरोना संक्रमण काळात काम केलेल्या डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार, विद्युत कर्मचाऱ्यांपाठोपाठ आता सुरक्षारक्षकांनाही कोविड भत्ता दिला जाणार आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांना दरमहा 10 हजार रुपये आणि सुरक्षारक्षक, रखवालदारांना दरमहा 5 हजार रुपये भत्ता दिला जाणार आहे.

कोरोना संक्रमणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत काम केलेल्या डॉक्टर, परिचारिका, लॅब असिस्टंटसह इतर मनुष्यबळ, सफाई कामगार या वर्ग 1 ते 4 मधील कर्मचाऱ्यांना महापालिकेने कोविड भत्ता दिला आहे. तसेच, वायसीएम आणि इतर रुग्णालय, दवाखान्यात काम केलेल्या विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांनादेखील भत्ता मंजूर केला आहे. त्याच धर्तीवर या काळात काम केलेल्या महापालिका आस्थापना, कंत्राटी आणि मानधनावरील सुरक्षारक्षकांना कोविड भत्ता दिला जाणार आहे.

1 एप्रिल ते 30 जून 21 या तीन महिन्यांचा कोविड भत्ता दिला जावा, असा सदस्य ठराव संमत करण्यात आला आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांना दरमहा 10 हजार रुपयांप्रमाणे 30 हजार, सुरक्षारक्षकांना दरमहा 5 हजार रुपयांप्रमाणे 15 हजार रुपये भत्ता द्यावा, असे स्थायी समितीने मंजुरी दिलेल्या ठरावात नमूद आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.