_MPC_DIR_MPU_III

Pimpri News : स्वच्छता अभियान अंतर्गत पालिकेची शाॅर्टफिल्म व गीत स्पर्धा 

एमपीसी न्यूज – भारत स्वच्छता अभियान  अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शाॅर्टफिल्म व गीत (जिंगल) स्पर्धेचे आयोजन केले आहे. सर्व वयोगटातील स्पर्धेकांसाठी हि स्पर्धा खुली असून, 15 नोव्हेंबर पर्यंत या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. 

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

भारत स्वच्छता अभियानाअंतर्गत आयोजित या स्पर्धेत स्वच्छतेसंबधित विविध विषय देण्यात आले आहेत. सादर करण्यात येणाऱ्या शाॅर्टफिल्म व गीतात (जिंगल) पिंपरी चिंचवड शहराचे नाव येणं अनीवार्य आहे. स्पर्धेकांना

आपली शाॅर्टफिल्म व गीत

[email protected] या ई-मेल पत्त्यावर पाठवता येणार आहेत.

* स्पर्धेसाठी खालील विषय देण्यात आले आहेत.

– कच-याबाबत नागरिकांची जबाबदारी

– ओला सुका कचरा वर्गीकरण

– हगणदारी मुक्त शहर

-कचरामुक्त शहर

– प्लास्टीकबंदी

– कोवीड-19 व स्वच्छता

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.