Chakan : पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 30) सायंकाळी साडेसहा वाजता खेड तालुक्यातील भांबोली येथे घडली.

पप्पू शिवेकर (रा. इंदुरी, ता. मावळ), बबलू जाधव (रा. म्हाळुंगे, ता. खेड) आणि अन्य एकजण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जखमी तरुणाची आई सविता रोहिदास पडवळ (वय 38, रा. भांबोली, ता. खेड) यांनी शनिवारी (दि. 31) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा शुक्रवारी सायंकाळी भांबोली येथील सर्विसिंग सेंटरवर जात असताना मुलाचे आणि एका जेसीबी चालकाचे भांडण झाल्याच्या रागातून आरोपी तिथे आले. अनोळखी आरोपीने फिर्यादी यांच्या मुलाला पकडून ठेवले. तर पप्पू आणि बबलू या दोघांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर आरोपी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.