Sangvi : किरकोळ कारणावरून तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून पाच जणांनी मिळून एका तरुणाला कोयता आणि सिमेंटच्या गट्टूने मारहाण करत खुनी हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि. 18) सकाळी दहा वाजता पिंपळे गुरव येथे घडला.

Talegaon : इंद्रायणी नदीत महिलेची आत्महत्या

मयूर चंद्रकांत शिंदे (वय 22, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयूर अवचरे, रिहान आरिफ शेख (वय 19, रा. पिंपळे गुरव), अमन गिल, शब्बास शेख, दानिश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयूर शिंदे हे शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास पिंपळे गुरव येथील एका चहाच्या दुकानासमोर थांबले असताना आरोपी मयूर अवचरे यांच्यासोबत झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून त्याच्या सांगण्यावरून आरोपी रिहान आणि अमन हे कोयता घेऊन आले. त्यांच्यासोबत शब्बास आणि दानिश हे देखील होते.

आरोपींनी फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी कोयता आणि सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. त्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी रिहान शेख याला अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.