Wakad : वर्गणीच्या नावाखाली जबरदस्तीने पैसे घेणाऱ्या सात जणांवर खंडणीचा गुन्हा

एमपीसी न्यूज – जयंती साजरी करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून वर्गणीच्या नावाखाली जबरदस्तीने पैसे घेणाऱ्या सात जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दोन एप्रिल रोजी चौधरी पार्क वाकड येथे घडली. या प्रकरणी 19 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sangvi : किरकोळ कारणावरून तरुणावर खुनी हल्ला

विशाल वैजनाथ वाव्हळकर, विशाल अशोक शिंदे, सुरज शंकर वाघमारे, आकाश देविदास मनवर, निखिल आप्पा सोनवणे, अमित नानासाहेब वाघमारे, किशोर राजू सूर्यवंशी (सर्व रा. वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी मोहम्मद वसीम नासिर राएन (वय 28, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी फिर्यादी मोहम्मद आणि प्रकाश गुजर यांना दमदाटी करून गोंधळ घालत शिवीगाळ करून पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास फिर्यादी यांच्या बेकरीचे दुकान उघडू न देण्याची धमकी देत त्यांच्याकडून अकराशे रुपये आणि प्रकाश गुजर यांच्याकडून पाचशे रुपये रक्कम खंडणी घेतली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.