Nashik News: प्रजासत्ताकदिनी नाशिक जिल्हा क्रिकेट संघ निवड चाचणीचे आयोजन

एमपीसी न्यूज – राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे 26 जानेवारीला क्रिकेट खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव समीर रकटे यांनी दिली.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने होणार्‍या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे खुल्या गटातील खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या स्पर्धेत जिल्हा संघ निवड चाचणी 26 जानेवारी रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे घेण्यात येणार आहे.

इच्छुक खेळाडूंनी नाशिक जिल्हा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथील कार्यालयात कामकाजाच्या वेळेत 25 जानेवारीपर्यंत चाचणी शुल्कासह आपली नावे नोंदवावीत.

नावे नोंदविलेल्या खेळाडूंनी क्रिकेट पोशाखात स्वतःच्या क्रिकेट साहित्यासह 26 जानेवारी रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सकाळी साडेनऊ वाजता हजर राहणे आवश्यक असणार आहे.

निवड झालेल्या खेळाडूंना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार असल्याचे रकटे यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.