Nashik News : राज्य उत्पादन शुल्क पथकाच्या कारवाईत साडे पाच लाखाचा मद्यसाठा जप्त

एमपीसीन्यूज : राज्य उत्पादन शुल्क विशेष भरारी पथकाने अवैध विदेशी मद्याच्या वाहनावर कारवाई केली. यामध्ये 5 लाख 39  हजार 140 रुपयांचा मुद्देमाल वाहनसह जप्त करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे यांनी कळविले आहे.

अधीक्षक डॉ. अंचुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 डिसेंबर रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली येथे विशेष भरारी पथकाने सापळा रचून केलेल्या कारवाईत एक पांढऱ्या रंगाची इको कार (क्र. जी.जे.05 आर.जे. 6276) या वाहनात पंजाब राज्य निर्मित व दादरा नगर हवेली येथे विक्रीस असलेले विदेशी मद्य आढळून आले.

यात ब्लॅक डॉग स्कॉच व्हिस्कीच्या (140 मिली) 44 सीलबंद प्लास्टिक बाटल्या, वॅट 69  स्कॉच व्हिस्कीच्या (180 मिली) 13  सीलबंद प्लास्टिक बाटल्या व ब्लेंडर प्राईड व्हिस्कीच्या ( 750 मिली) 4 सीलबंद बाटल्या असा एकूण 5 लाख 39  हजार  140 रुपयांचा मुद्देमाल वाहनसह जप्त करण्यात आला.

यासह मद्याची वाहतूक करणारा मनीष नानुभाई खेनी (रा. वराछा, सुरत, गुजरात) यास ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई निरीक्षक सुनील देशमुख, दुय्यम निरीक्षक राजेश धनवटे, जवान वीरेंद्र चव्हाण, शाम पानसरे, दीपक आव्हाड, गौरव तारे, विष्णू सानप, महेश सातपुते यांच्या विशेष भरारी पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.