CSK Ice Squash Trophy : महाराष्ट्रातील खेळाडूंनी विजयी कामगिरीसह उद्घाटनाचा दिवस गाजवला

एमपीसी न्यूज – आयस्क्वॉश अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित ‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ २०२२ खुल्या  (CSK Ice Squash Trophy)  राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेच्या विविध गटामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उद्घाटनाचा दिवस गाजवला.

 

ही ३-स्टार एसआरएफआय राष्ट्रीय स्पर्धा मुंढवा येथील चंचला संदीप कोद्रे (सीएसके) स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आजपासून सुरू झाली. स्पर्धेमध्ये भारतातील 21 राज्यांतील 563  खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.

 

Indian Rupee : रुपया पुन्हा घसरला; 78.87 इतका झाला प्रति डॉलर

 

 

15 वर्षाखालील गटाच्या पहिल्या फेरीत  (CSK Ice Squash Trophy) महाराष्ट्राच्या अर्थव मेंढे याने नवव्या मानांकित झारखंडच्या विराज जयस्वाल याच्यावर संघर्षपूर्ण विजय नोंदविला. अर्थवने विराजचा 14 – 12, 11 – 6, 3 – 11, 3 – 11,  11 – 9 असा पाच सेटमध्ये पराभव केला. याच गटात पश्‍चिम बंगालच्या विहान छलान याने महाराष्ट्राच्या स्वर साबू याच्यावर 12 – 10, 11 – 5, 9 – 11, 11 – 6 असा विजय मिळवला. आतिक यादव या महाराष्ट्राच्या खेळाडूने चंदीगढच्या उचीत सोनी याचा 9 – 11, 11 – 5, 11 – 7, 12 – 10 पराभव केला. महाराष्ट्राच्या अमेश दत्ता याने उत्तरप्रदेशच्या विहान गुप्ता याचा 11 – 1, 11 – 2, 11 – 9 असा सहज पराभव केला.

 

 

स्पर्धेचे संक्षिप्त निकालः पहिली फेरी

पुरूष गटः सनी यादव (महा) वि.वि. आरीव्ह दमानी (मध्य प्रदेश)  11 – 1, 11 – 1, 11 – 1;
स्वराज दालमिया (पश्‍चिम बंगाल) वि.वि. नमन दुबे (मध्य प्रदेश)  11 – 7, 11 – 2,  11 – 5;
एकबिर सिंग (महा) वि.वि. हार्दीक गुप्ता (पश्‍चिम बंगाल) 11 – 7,  11 – 2, 11 – 4;
सिध्दांत पाटील (केरळ) वि.वि. आयुष किरण (कर्नाटक) 11 – 3, 11 – 3, 11 – 2;
प्रज्ञेश मोरे (महा) वि.वि. संकल्प सिंग (चंदीगढ) 11 – 3, 11 – 2, 11 – 2;
रूद्र लखानी (महा) वि.वि. हृधान शहा (महा) 11 – 4, 11 – 8, 11 – 4;
देव शर्मा (महा) वि.वि. उदीत शर्मा (महा) 11 – 6, 10 – 12, 11 – 9, 11 – 9;
कृष्णा देरवडा (महा) वि.वि. आदित्य भंडारी (उत्तराखंड) 11 – 4,  0 – 11,  11 – 6, 11 – 5;

11  वर्षाखालील गटः अरमान चौधरी (महा) वि.वि. केतन सांब्रे (महा) 11 – 5, 11 – 7,  4 – 11, 11 – 8;

 

 

कौशल सिंघवा (महा) वि.वि. अंश मल्होत्रा (महा) 11 – 2, 11 – 1, 11 – 3;
रोहन दरवाडा (महा) वि.वि. सांश मल्होत्रा (महा) 11 – 1,  11 – 0, 11 – 1;
सिध्दांत रंजीथ (महा) वि.वि. मोहन सिंगवा (महा) 11 – 4, 11 – 2, 11 – 3;

 

 

 

१३ वर्षाखालील गट –
ज्योएल दिनकरन (तामिळनाडू) वि.वि. रिधीम पोनेकर (महा) 11 – 2, 11 – 1, 12 – 10;

 

अर्जुन केजरीवाल (महा) वि.वि. आयान अलि (मध्यप्रदेश) 11 – 8, 11 – 5, 11- 2;

 

कमलेश दमढेरे (महा) वि.वि. आदित्य मयुर (महा) 11 – 3, 11 – 4, 11 – 5;

 

अर्णव धारीया (महा) वि.वि. रामंजुन सुरेश (तामिळनाडू) 11 – 0, 11 – 0, 11 – 0;

 

विवान खन्ना (महा) वि.वि. अर्णव देवसिंग रावत (तामिळनाडू) 11 – 2,  11 – 0, 11 – 1;

हर्ष जोशी (महा) वि.वि. इझान कोतवाल (महा) 11 – 3, 11 – 2, 11 – 3;

 

 

15 वर्षाखालील गट –

 

विहान छलान (पश्‍चिम बंगाल) वि.वि. स्वर साबू (महा) 12 – 10, 11 – 5, 9 – 11, 11 – 6;
अर्थव मेंढे (महा) वि.वि. विराज जैस्वाल (झारखंड, मानांकन – 9 ) 14 – 12, 11 – 6,  3 – 11, 3 – 11, 11 – 9;
आतिक यादव (महा) वि.वि. उचीत सोनी (चंदीगढ) 9 – 11, 11 – 5, 11 – 7, 12 – 10;
अमेश दत्ता (महा) वि.वि. विहान गुप्ता (उत्तरप्रदेश) 11 – 1,  11 – 2,  11 – 9

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.