Pune : सौंदर्यशास्त्रावर ए बी टी सी तर्फे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

एमपीसी न्यूज – कोरोना काळात सौंदर्यप्रसाधन व्यवसायावर सावट आल्याने असोसिएशन ऑफ ब्युटी थेरपी अँड कॉस्मेटोलॉजी (ए बी टी सी) ने 19 जुलै रोजी वानवडीतील (Pune)महात्मा फुले सभागृहात सौंदर्यशास्त्रासंबंधी राष्ट्रीय परिषदचे आयोजन केले आहे. या परिषदेमध्ये सौंदर्यशास्त्रामधील आधुनिक साधने व त्यांचा वापर याविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

Maharashtra News : एका वेळी जास्तीत जास्त मिळणार 50 टन वाळू

संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संस्थेच्या अध्यक्षा मनोरमा कांतावाला, कार्याध्यक्षा स्मिता देव, सचिव अंजली जोशी, कोषाध्यक्ष तृप्ती शहा, कार्यक्रम नियोजक सुनंदा महाराणा, शिक्षण प्रभारी अजिता सुर्वे आणि नम्रता गौड हे उपस्थित होते.

 

लॉकडाऊनमुळे ज्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट आले अशा पुण्यातील व पुण्या बाहेरील सौंदर्यप्रसाधन व्यावसायिकांना तसेच वस्तीतील महिला, मुली, तृतीयपंथी यांना संस्थेने सौंदर्य शास्त्राचे प्रशिक्षण देऊन उत्पन्नाच्या दृष्टीने त्यांना सक्षम केले.

 

भारतात सौंदर्य व्यवसायाची मागणी वाढते आहे. यानिमित्त सौंदर्यशास्त्रावर व उपचार पद्धतींवर योग्य प्रशिक्षण‌ येथे दिले जाणार आहे. परिषदेत या क्षेत्रातील तज्ञ येऊन व्याख्यान, प्रात्यक्षिके यांद्वारे मार्गदर्शन करतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.