Hinjwadi : ब्लिस इंडीफाय इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापकासह संचालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – हिंजवडी (Hinjwadi) परिसरातील ब्लिस इंडीफाय इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापकासह संचालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाची मान्यता नसताना शाळा चालवून विद्यार्थ्यांचे प्रवेश केले असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra News : एका वेळी जास्तीत जास्त मिळणार 50 टन वाळू

मुख्याध्यापक सिझा अली खान, संस्थेचे संचालक गौतम बुधराणी (दि.12)अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी केंद्र प्रमुख सुरेश लक्ष्मण साबळे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने ठरवून दिलेल्या अटी आणि नियमांचे तसेच कागदपत्रांची पूर्तता न करता आरोपींनी शाळा सुरू केली. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे अनधिकृतरित्या प्रवेश केले. शाळेच्या पटावर नोंदणी करून विद्यार्थ्यांकडून अनधिकृतपणे भरमसाठ फी वसूल केली. शाळा अनधिकृत असून सुद्धा शाळा अधिकृत आहे असे भासवले.

 

इतर शाळांना दाखला मागणी करणे, विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले घेणे, विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले देणे, असे प्रकार आरोपींनी केले. आरोपींनी अनधिकृतपणे शाळा चालवून शासनास आवश्यक असलेला महसूल बुडवला. यामध्ये शासनाची, पालकांची व विद्यार्थ्यांची फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी (Hinjwadi) पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.