Navi Disha :  नवी दिशा हा उपक्रम महिला बचत गटांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणार – आयुक्त पाटील

एमपीसी न्यूज – नवी दिशा हा उपक्रम ख-या अर्थाने प्रेरणेची दिशा दाखविणारा असून महिला बचत गटांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे, असा आशावाद आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी व्यक्त केला.  कोणत्याही कामाला कमी न लेखता स्वयंप्रेरणेने समाजासाठी केलेले काम अभिमानास्पद असते.  नवी दिशा (Navi Disha)  प्रकल्पाच्या माध्यमातून बचत गटांनी काम घेऊन ते जबाबदारीने पार पाडल्यास या उल्लेखनीय कामाची देशभर चर्चा होईल, असे मत देखील पाटील यांनी व्यक्त केले.

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्यावतीने नवी दिशा प्रकल्प (Navi Disha) सुरु करण्यात आला असून त्याद्वारे सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी महिला बचत गटांना विविध काम देण्यात येत आहे. यामुळे बचत गटांना रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध होत आहे. त्यादृष्टीने महापालिका क्षेत्रातील सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांच्या देखभाल दुरुस्तीचे काम दिले जात आहे.  आज ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील तीन बचत गटांना असे काम देण्यात आले.  या कामाचा कार्यादेश आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते संबंधित बचत गटांना देण्यात आला. त्यावेळी आयुक्त राजेश पाटील बोलत होते.

Irfan Syed: माथाडी कामगारांना आर्थिक पाठबळ  देणाऱ्या रायरेश्वर व मातोश्री पतसंस्थेचे सहकारामध्ये उल्लेखनीय काम – इरफान सय्यद

 

दापोडी येथील आनंदवन वसाहत येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, कार्यकारी अभियंता अनिल राऊत, सहाय्यक आरोग्य अधिकारी महेश आढाव, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, माजी नगरसदस्या  माई काटे, माजी नगरसदस्य राजेंद्र काटे, माजी स्वीकृत सदस्य अनिकेत काटे, समूह संघटिका वैशाली लगाडे, वीणा तिटकारे, महाराष्ट्र कुष्ठपिडीत संघटनेचे उपाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, आनंदवन वसाहतीचे पंच दिपक धोत्रे, प्रतिनिधी सुरेखा दोडमणी, सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे, रवी कांबळे, विक्रम नाणेकर, राधा संगीत, राजेश दुधाळ, तुषार दोडमणी, बचत गटांच्या प्रतिनिधी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

स्वयंप्रेरणेने केलेले काम स्वावलंबी बनविण्यासाठी पुरक असते असे नमूद करुन आयुक्त राजेश पाटील म्हणाले, महिलांमध्ये कोणतीही जबाबदारी पेलण्याची ताकद असून त्या एकत्र येतात तेव्हा मोठी शक्ती (Navi Disha) तयार होते.  याचे स्वरुप बचत गटांच्या माध्यमातून पुढे येत आहेत.  बचत गटांना रोजगाराची संधी देणे आणि नवीन काम करण्यासाठी विश्वास देणे गरजेचे असते.  क्षमता, अनुभव, पाठबळ आणि योग्य प्रशिक्षणाच्या बळावर बचत गट अधिक सक्षम होत असतात.  लोकसहभागातून परिसर व शहर स्वच्छता राखण्यामध्ये महिलांचा सहभाग महत्वपूर्ण असतो, या पार्श्वभूमीवर या बचत गटांना सार्वजनिक शौचालय स्वच्छता व देखभाल दुरुस्तीचे काम नवी दिशा प्रकल्पाच्या माध्यमातून दिले जात आहे.  याद्वारे बचत गटांचे पुनर्नवीकरण करण्याच्या उद्देश आहे.  त्यामुळे प्रत्येक बचत गटांना पुढे जाण्याची संधी मिळणार आहे.

 

Mahatashtra Political Crises : काय सांगता! अखेरच्या दोन दिवसात 1690 कोटींच्या कामांना मंजुरी

 

आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने बचत गटांना महापालिकेच्या वतीने कोणकोणती कामे दिले जाऊ शकतात याचे धोरण आखले जात आहे.  अंगणवाडीतील बालकांसाठी पोषक आहार बनविण्याचे काम, लहान उद्याने देखभाल दुरुस्तीचे काम, कंपोस्ट खत निर्मिती आदी कामांचा त्यात समावेश करण्याचे विचाराधीन आहे.  प्लॅस्टीकमुक्तीसाठी नागरिकांना पर्यायी कापडी पिशव्या उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत.  बचत गटांना अशा पिशव्या तयार करण्याचे काम दिल्यास प्लॅस्टीकमुक्त शहराची मोहिम यशस्वी होण्यास मदत होणार आहे, असे आयुक्त राजेश पाटील म्हणाले.  बचत गटांनी केलेल्या कामापासून इतर बचत गट देखील प्रेरणा घेऊन सक्षमीकरणाच्या प्रवाहात पुढे येतील, असा विश्वास आयुक्त पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

कुष्ठरोग पिडितांना महापालिकेच्या माध्यमातून आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल.  कुष्ठपिडीत प्रमाणपत्र देण्यासाठी गरज पडल्यास विशेष शिबीराचे आयोजन करण्याबाबत तसेच या वसाहतीमधील समस्या सोडविण्यासाठी महापालिका पुढाकार घेईल, असे आयुक्त पाटील यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक विजयकुमार थोरात यांनी केले.  सूत्रसंचालन रविंद्र तनपुरे यांनी केले तर आभार सुहास बहाद्दरपुरे यांनी मानले.     संकल्प महिला मंडळ बचत गटाला दरमहा १४,४०० रुपये, प्रेरणा महिला मंडळ बचत गटाला गटाला २३,४०० रुपये आणि  रमाई महिला बचत गटाला दरमहा १६,२०० रुपये कामापोटी देण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.