Maharashtra Government Formation : फडणवीस, शिंदे यांचा सायंकाळी सातला शपथविधी

एमपीसी न्यूज – उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. या पार्श्वभूमीवर भाजपकडून शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील (Maharashtra Government Formation) आमदारांच्या गटासह सत्तास्थापनेसाठी वेगाने हालचाली सुरु झाल्या आहेत.त्यामुळे आज सायंकाळी सात वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची व एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

Mahesh Landage : आमदार महेश लांडगे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार?

 

 

 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे गुरुवारी सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. हे दोघेही साडेतीन वाजता राजभवनावर जाणार आहेत. दरम्यान, नुकतीच भाजप कोअर समितीची बैठक संपली असून यात विविध विषयांवर चर्चा झाली.एकनाथ शिंदे हे थेट गोव्याहून फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचतील.त्यानंतर भाजपचे एक शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे.

 

 

 

 

राजकीय नाट्यावर पडदा

 

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि राज्यातील  (Maharashtra Government Formation) सत्तासंघर्षाची सुरुवात झाली.शिवसेनेतील काही आमदारांसह शिंदे नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह बाहेर आला.एकापाठोपाठ आमदार आणि मंत्री शिंदेंच्या गटात सामील होऊ लागले.तेव्हापासूनच महाविकास आघाडी सरकारचं काऊंटडाऊन सुरु झाल होत.आरोप प्रत्यारोपांची सत्र रंगली आणि अखेर या राजकीय नाट्यावर पडदा पडला तो म्हणजे उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे.त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.