Talegaon Dabhade: बापूसाहेब भेगडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला नवाब मलिक उपस्थित राहणार

माजी आमदार कृष्णराव भेगडे यांना जीवनसार्थक पुरस्कार

एमपीसी न्यूज- बापूसाहेब भेगडे वाढदिवसानिमित्त आज, शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते नवाब मलिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने प्रथमच नवाब मलिक यांचे तळेगाव येथे आगमन होणार आहे.

यावेळी यंदाचा जीवनसार्थक पुरस्कार माजी आमदार मावळ भूषण कृष्णराव भेगडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. माजी खासदार विदुरा उर्फ नानासाहेब नवले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री मदन बाफना असणार आहेत. माजी आमदार विलास लांडे, इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रा. यशवंत गोसावी उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.