Pimpri: नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये रुबेला लसीकरण

एमपीसी न्यूज– पिंपरी चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शनिवार (दि. 8) रोजी रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या अभियानाला शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

 शाळेमध्ये लहान गटापासून इयत्ता सहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांकडून लस टोचण्यात आली. एका राष्ट्रव्यापी अभियानाद्वारे शाळा आणि बाह्यसंपर्क सत्राच्या माध्यमातून गोवर आणि रुबेलापासून बालकांचे रक्षण करणाऱ्या गोवर–रुबेला (एमआर)  लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झालेला आहे. गोवरचे दूरीकरण आणि रुबेलाचे नियंत्रण करण्यासाठी 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना एमआरची लस टोचणे अत्यावश्यक आहे.
 
यावेळी आकुर्डी रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवे, संभाजीनगर रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिदास शेंडे, तसेच आकुर्डी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला पगारे यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी शाळेच्या वैद्यकीय परिचारिका पूनम थोरात यांनी संपूर्ण व्यवस्थापन पाहिले. यावेळी पिंपरी – चिंचवड प्रभाग क्रमांक 10 च्या नगरसेविका श्रीमती अनुराधा गोरखे, नॉव्हेल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे, प्राचार्या डॉ. कांचन देशपांडे, डॉ. प्रिया गोरखे आदी उपस्थित होते. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.