NCP : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची एका व्यक्तीला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पुणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. जाहिरातीच्या बिलाचे पैसे मागण्यासाठी ही व्यक्ती गफूर यांच्याकडे केली होती. पैसे मागितल्याचा राग आल्याने गफूर पठाण यांनी शिवीगाळ करत या कर्मचाऱ्याला लाथ मारून पाहून घेण्याची धमकी दिली.

याप्रकरणी अतुल माधव संगमनेरकर (वय 55) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार हाजी गफूर पठाण (वय 45) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कोंढवा परिसरातील मिठा नगर येथील अशोक न्यूज सोसायटीजवळ शुक्रवारी घडला.

Pune : 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, शेजारीच राहणारा 24 वर्षीय तरुण गजाआड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे एका ऍडव्हर्टायझिंग कंपनीत नोकरीला आहेत. त्यांच्या कंपनीचे कोंढवा परिसरात जाहिरातीचे होर्डिंग आहे. हाजी गपूर पठाण यांनी कोणतीही परवानगी न घेता या होर्डिंगवर आपल्या वाढदिवसाचे बॅनर लावले होते. दरम्यान बॅनर लावल्याने कंपनीने त्याचे बिल फिर्यादी यांच्या ऑफिसवर पाठवले होते. या बिलाची रक्कम घेण्यासाठी फिर्यादी हाजी गफूर पठाण यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर पठाण यांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणी पुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शीळीमकर अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.