NCP : घड्याळ ही तेच, वेळ ही तीच आणि मालकही तेच; अजितदादांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार गटाचे जोरदार शक्तिप्रदर्शन

एमपीसी न्यूज – घड्याळ ही तेच, वेळ ही तीच आणि (NCP)मालकही तेच..मालक फक्त साहेब असा नारा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात शरद पवार गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरीतील (NCP )शनि मंदिरालगत मध्यवर्ती पक्ष कार्यालय सुरु केले आहे. या कार्यालयाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते आज (शनिवारी) उद्घाटन झाले.

त्यानंतर पिंपरीत पक्षाचा मेळावा होत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, माजी आमदार जयदेव गायकवाड, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शहराचे निरीक्षक प्रशांत म्हस्के, युवक अध्यक्ष इम्रान शेख आदी उपस्थित होते.

Pimpri : पिंपरीत जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला चांगले दिवस येतील. जे आहेत त्यांच्यासोबत लढणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, कार्यालयापासून सभेच्या ठिकाणापर्यंत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केली. जेसीबीच्या सहाय्याने मोठा हार घालून जयंत पाटील यांचे स्वागत केले. दरम्यान, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सुमन पवळे या व्यासपीठावर येऊन परत गेल्या. त्यामुळे पवळे या शरद पवार गटात आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.