Pune : साधू वासवानी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यास महापालिका प्रशासनातर्फे नियोजन

एमपीसी न्यूज – कोरेगाव पार्क ते कॅम्प यांना जोडणाऱ्या साधू (Pune)वासवानी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यास महापालिका प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे. पोलिसांकडून वाहतूक वळविण्याचा निर्णय झाल्यास पुढील आठवड्यात या पुलाच्या कामास प्रारंभ होणार आहे.

कोरेगाव पार्क ते कॅम्प परिसराला जोडणाऱ्या या रस्त्यावर ‘रेल्वे ट्रॅक’ आहेत. वरून वाहतूक सुरू ठेवण्यासाठी साधू वासवानी पुलाची निर्मिती करण्यात आली होती. या पुलाचे आयुर्मान ५० वर्षांपेक्षा अधिक झाले आहे.

Mahalunge : ट्रेलर चोरून नेणाऱ्या चोराचा केला खून , गुंडा विरोधी पथकाकडून 48 तासात खूनाचा उलगडा

तो नेमका कधी व कोणी बांधला, याची कोणतीही (Pune)अधिकृत माहिती पुणे महापालिकेला नाही. हा पूल धोकादायक झाल्याने मागील वर्षभरापासून त्यावरील जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. या ठिकाणी चारपदरी पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ८३ कोटी रुपये खर्च होणार आहे. या पुलाच्या कामासाठी निविदा प्रक्रियाही राबवली आहे. पुलाचे काम सुरू करण्याच्या हालचाली पुणे महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे.

प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांनी सांगितले की, या पुलाचे काम सुरू करण्यासाठी पुलावरील वाहतूक वळवावी लागणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडे तशी मागणी करण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात त्यावर निर्णय होणार आहे. आठवडाभरानंतर या पुलाच्या कामास सुरुवात होणार आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात पुलासाठी २० कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. पुढील काळात या पुलासाठी येणारा खर्च देण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ७२ (ब) प्रमाणे ८३ कोटी रुपयांचे दायित्व स्वीकारण्याचा निर्णयही स्थायी समितीत घेण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.