Charholi : स्प्रिंग व्हॅली सोसायटीचे सभासद समस्यांनी त्रस्त; वेळप्रसंगी मंत्रालयात धाव घेण्याचा माजी नगरसेविकेचा इशारा

एमपीसी न्यूज : – च-होलीतील स्प्रिंग व्हॅली सोसायटी मधील(Charholi ) नागरिक मागील सहा वर्षापासून विविध मूलभूत समस्यांनी त्रस्त आहेत. पार्किंग नाही , वॉल कंपाऊंड नाही, फायर सिस्टीम कार्यान्वित नाही, सेफ्टी टँक बांधकाम व्यावसायिकाने कार्यान्वित केला नसल्याचा निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका विनया तापकीर यांच्या नेतृत्वाखाली आज (शनिवारी) निषेध मोर्चा काढला. सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी मंत्रालयात धाव घेण्याचा इशाराही तापकीर यांनी दिला.

सभासदांसह माजी नगरसेविका विनया तापकीर (Charholi )यांनी आंदोलन केले. गेले सहा वर्ष स्प्रिंग व्हॅली सोसायटी मधील सभासद मूलभूत समस्यांना सामोरे जात आहेत. 2017 मध्ये इमारतीचे पझेशन मिळाले आहे. आजमितीला 6 वर्ष पूर्ण होत आले आहेत. असे असतानाही कव्हर पार्किंग दिली नाही. वॉल कंपाऊंड बांधली नाही. फायर सिस्टीम कार्यान्वित केली नाही. सेफ्टी टँक कार्यान्वित नाही अशा अनेक मुलभुत गोष्टींची बांधकाम व्यावसायिकाने पूर्तता केली नाही. त्याच सोबत निकृष्ट दर्ज्याचे काम केले आहे. बिल्डिंगच्या दाखवलेल्या स्वप्नांचा बेरंग केला आहे, हे बेसिक अनिमिटीज पाहिल्या की लक्षात येतेच.

याबाबत स्प्रिंग व्हॅली मधील रहिवाशांनी वेळोवेळी आवाज उठवला. अगदी महापालिकेचा दरवाजा देखील टोठावून आले आहेत. पण या बदल्यात त्यांना न्याय मिळण्याचा ऐवजी बिल्डरचा वैयक्तिक पातळीवर त्रास वाढला आहे.

NCP : घड्याळ ही तेच, वेळ ही तीच आणि मालकही तेच; अजितदादांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार गटाचे जोरदार शक्तिप्रदर्शन

 

नागरिकांवर होणाऱ्या अन्याया, बिल्डरच्या हुकूमशाही, अरेरावीपणाच्या आणि सहकार्य न करण्याच्या भूमिकेच्या निषेधार्थ आज निषेध मोर्चा आम्ही काढला. आज हा मोर्चा आम्ही शांततापूर्ण मार्गाने काढला आहे. भविष्यात न्याय मिळाला नाही. तर, आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ अगदी वेळ पडली. तर मंत्रालयात धाव घेऊ असा इशारा देतानाच स्प्रिंग व्हॅलीच्या नागरिकांच्या सोबत मी हा लढा यशस्वी करणारच अशी ग्वाही माजी नगरसेविका तापकीर यांनी दिली.

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share